दापोली : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि वनविभाग दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ ऑक्टोबर २०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:१५ वाजता सुरु होईल. सायकल फेरी मार्ग आझाद मैदान- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक- एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक- डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, वनशास्त्र महाविद्यालय- नर्सरी रोड- परिक्षेत्र वन अधिकारी कार्यालय- आझाद मैदान असा ६ किमीचा असेल. समारोप आझाद मैदानात ९:३० वाजता होईल. या सायकल फेरीमध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ वनशास्त्र विभागाचे डॉ नारखेडे, डॉ राणे व सहकारी, दापोली परिक्षेत्र वन अधिकारी श्री वैभव बोराटे सर व सहकारी, प्राणीमित्र, पक्षीमित्र, सर्पमित्र इत्यादी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षी वन्यजीव निरीक्षण, सर्प विषयक कार्यक्रम होतील.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९०२२८७४८८१, ८६५५८७४४८६ हे आहेत. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लब मार्फत विनामूल्यपणे सायकल विषयक उपक्रम, गरजूंना सायकल वाटप, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि इतरांनाही सायकल चालवायला प्रेरित करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.