जिल्हा निरीक्षक संतोष खोपकर यांनी केले मार्गदर्शन
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडी तालुका खेड यांच्या वतीने कार्यकर्ता प्रक्षिक्षण शिबिर आणि संवाद मेळावा दिनांक २२/०९/२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रम तालुका अध्यक्ष मा.बी.जी.गमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
जिल्हा प्रभारी व निरीक्षक आद, संतोषजी खोपकर यांनी कार्यकर्त्यांना प्रक्षीक्षण दिले मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते डी. ये. पवार, गौतम जे. तांबे यांनी आपले विचार मांडले.
या मेळाव्याचे प्रस्ताविक जिल्हा सचिव महेंद्रजी पवार यांनी केले. त्यांनतर कार्यकर्ता प्रशिक्षणाला सुरुवात झाली. या मेळाव्याचे औचित्य साधून जेस्ट कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी जिल्हा महासचिव सुदर्शन सकपाळ, आणि मंडणगडचे पदाधिकारी मर्चंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुकाउपाध्यक्ष अशोकजी सकपाळ, गिरीश ये. गमरे ,सखाराम जाधव ,अनंत पवार, विनोद मोहिते, हरीश बंडू पवार, चंद्रकांत जाधव ,सूर्यकांत सु.तांबे, सखाराम शा.जाधव, अनंत भी. पवार, सचिन रुके, सचिन हलदे, भागूराम तांबे, बाबाराम तांबे ,राजेंद्र पवार गौतम मर्चंडे आणि इतर मान्यवर तालुक्याचे व सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मेळाव्यास बहुजन समाज लक्षणीय उपस्थित होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालक जिल्हा सहसचिव श्रीकांत सकपाळ यांनी केले.