वाबळेवाडी येथील महाराष्ट्रभर गाजत असलेली उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी इयत्ता सातवीच्या वर्गाने पुढाकार घेऊन बालसभा आयोजित केली होती. या बालसभेचे अध्यक्ष शर्वरी पाचरणे या विद्यार्थिनीच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, माजी सरपंच केशव वाबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

              राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बालसभेचे अध्यक्ष शाळेतील विद्यार्थिनी शर्वरी पाचर्णे हिला करून तिच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रतिसाद देत तब्बल 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपले विचार व्यासपीठावर व्यक्त केले. यात वेदांगी गवारे, आराध्या शेळके, सान्वी बेंडभर, ईश्वरी रणसिंग, अनन्या बांगर, स्वरूप मस्के, स्वरा बोऱ्हाडे, पियुश माळी, प्रतिक धुमाळ, कौस्तुभ निकम, साईराज आवटे, विधी सुर्वे, अर्णव मुळे, क्षितिज जाधव, आरुष घाडगे, तनिष्का खटके, श्रीमयी दिघे, वेदांत बोऱ्हाडे, अशमिका पाटील सृष्टी नेमाने, अजिंक्य दरंदले आणि बाल सभेच्या अध्यक्षा शर्वरी पाचर्णे आधी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली.

          यावेळी वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शालेय विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन देशासाठी व समाजासाठी कार्य केले पाहिजे. देशात आदर्शवत नागरिक निर्माण होण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात महापुरुषांचा संदर्भात विविध पुस्तके वाचून त्यांच्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. तरच भविष्यात चांगला समाज निर्माण होईल.

      तर उपक्रमशील शिक्षक संदीप गिते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा साहित्यिक प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फकीरा कादंबरी विषयी माहिती दिली. तसेच स्मशानातील सोनं या त्यांच्या पाठातील मर्म विद्यार्थ्यांना सांगितले.

     शाळेतील क्रीडा शिक्षक पोपट दरंदले यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या गुणांचे आचरण करावे असे सांगून त्यांनी टिळकांविषयी सुंदर बोधकथा सांगितली. तसेच बालसभा म्हणजे विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ. याच व्यासपीठावर भावी वक्ता तयार होणार आहे असे म्हणत असे उपक्रम वारंवार शाळेत होतील, असे आश्वासन त्यांनी शालेय मुलांना दिले.

          या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. 

            तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सदस्य प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

               वाबळेवाडी शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.