वैजापूरः विष बाधित भगर खाल्ल्याने शहंर व  तालुक्यातील विष बाधित रुग्णांवर वैजापूरातील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी डॉक्टरांनी योग्य व तातडीने उपचार केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही त्यामुळे  रुग्ण ही आटोक्यात आले असून  बुधवारी सायंकाळी पासुन एकही रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनी सांगीतले.

उपजिल्हा राजपूत यांनी रुग्णालयात भेट दिली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी दिलेल्या माहीती नुसार रुग्णालयात ५३ बाधित रुग्ण दाखल झाले होते. सर्व रुग्णांनी उपचार घेवून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. बहुतेक खाजगी रुग्णालयात देखील बाधीत रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. या प्रसंगी  वैद्यकीय अधिकारी डॉ,मुंढे, श्रीमती डॉ.गायकवाड, डॉ.पाटणी,  डॉ.धोत्रे व परिसेविका रुखमींनी गवई,  श्रीमती केदारे,  श्रीमती सातदिवे व सहायक एस. बी.उचित, एम.एम.मापारी, अजय जाधव, आर.टी.नारळे,  बी.के. दुधारे यानी या रुग्णांवर उपचार साठी सहकार्य केले.