माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी वाडी (लावंड वस्ती) येथे

धैर्यशील रामकृष्ण लावंड यांच्या शेतात बिबट्याचा वावर दिसून येते असून या बिबट्याने लावंड यांच्या शेतातील देशी खिलार कालवड ऊसात घेऊन गेला आहे. तेथे त्याच्यावर हल्ला केला. या प्रकारामुळे या परिसरातील शेतकरी वर्गात मात्र भितीचे झाला आहे. चौंडेश्वरवाडी येथील शेतकरी धैर्यशील लावंड यांच्या शेतामध्ये २६ तारखेला रात्री दहा वाजता बिबट्याने या वासरावर हल्ला चढवला. शेतात तीन देशी खिलारी जातीच्या गायी होत्या. या बिबट्याने एका वासराला ऊसात ओढत घेऊन गेला व त्या वासरच्या अंगावर मोठ मोठे लचके काढल्यामुळे हे वासरू ऊसातच मरून पडलेले होते. तर दुस-या वासराला जखमी करून सोडले आहे.चौडेश्वर वाडी पासून शंकरनगर हे अंतर थोडेच असून या बिबट्याच्या वावरण्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. आज दुपारी वन विभाग अधिकारी यांनी या परिसराची पहाणी करून पंचनामा केला आहे. हा परिसर पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.