भारतीय कुस्ती महासंघ आयोजित दिल्ली येथे होणाऱ्या फेडरेशन कप या राष्ट्रीय कुमार स्पर्धे साठी महाराष्ट्र कुस्ती संघात अकलूज येथील ताराराणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील कु.रोशनी ज्ञानेश्वर बोडके हीची निवड झाली.

गेल्या महिन्यात दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ताराराणीच्या वेदिका शेंडे हिने कास्य पदक मिळवले होते.आता देखील दिल्ली येथे भारतीय कुस्ती महासंघ आयोजित होणाऱ्या फेडरेशन कप या राष्ट्रीय कुमार स्पर्धेसाठी ताराराणीच्या रोशनी बोडके या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवडझाल्याने शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनपर चालणारे ताराराणी कुस्ती केंद्र,राष्ट्रीय पातळीवरील उच्च व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणारे कुस्ती केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास येत आहे,पुणे, खराडी येथे महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडली यात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत १७ वर्षाखालील ६१ किलो वजन गटात रोशनी बोडके हीची निवड झाल्याबद्दल शिवरत्न कुस्ती केंद्राचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी तिचे व कुस्ती केंद्राचे NIS प्रशिक्षक सतपाल सिंह, NIS कोच सुहास तंरगे यांचे अभिनंदन केले.