शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोमवारी घटस्थापना होणार आहे. प्रथमच घटस्थापनेनंतर गोरडवाडी ता. माळशिरस येथे ग्रामदैवत श्री बिरोबा यात्रेनिमित्त मंगळवार दि‌. 27/09/2022 रोजी दिवसभर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शेळी व मेंढरांच्या जातीची भव्य यात्रा भरणार आहे.

माळशिरस तालुक्यात शेळी, मेंढी पालन करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. यात्रेत अनेक जातींच्या शेळ्या व मेंढ्या येणार आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांना खरेदी विक्रीचा फायदा व्हावा यासाठी, बिरोबा यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ व बिरोबा यात्रा कमिटी यांच्यावतीने भव्य शेळी मेंढी यात्रा महोत्सव पहिल्यांदाच भरविण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.