कन्नड तालुक्यातील नाचनवेल धारेश्वर टाकळी शाहू ग्रामीण रस्ता क्रमाक २२२ असून नाचनवेल बस स्टॅन्ड ते धारेश्वर मंदिर हा जवळपास दोन कि . मी . लांबीच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे . गावात वाहनांना प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून पंचक्रोशीतील प्रसिद्ध धारेश्वर ट्रस्ट देवस्थानकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे . शिवाय नाचनवेल टाकळी शाहू जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता आहे . प्रसिद्ध देवस्थान असल्याने या ठिकाणी भाविक भक्तांची नेहमी वर्दळ असते . गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही . त्यामुळे भाविक भक्तांसह वाहनधारकांचे रस्त्याअभावी हाल होत आहे . त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची पुनर्बांधणी करून रूंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांसह ग्राम पंचायतीने केली आहे