पैठण : आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेच गद्दार पालकमंत्री संदीपान भुमरे पाचोडमध्ये नवनिर्वाचित पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार युतीतुन निवडून आले आणि गद्दारीकरून सरकार महाविकास आघाडीसोबत हात मिळवणी करून भारतीय जनता पार्टीसोबत उद्धव ठाकरे यांनी स्वतःच गद्दारी केली . मात्र आज आम्हाला गद्दार म्हणता . आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली असल्याची टिका नुकतेच औरंगाबादचे नवनियुक्त पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केली . पाचोड येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी नवनिर्वाचित पालकमंत्री संदीपान भुमरे यांची पाचोड येथील पैठण चौकातून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली . यावेळी ग्रामपंचायततर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मंत्री भुमरे म्हणाले की , तब्बल बावीस वर्षानंतर औरंगाबाद जिल्हाला स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे . पालकमंत्री पदाची धुरा माझ्यावर सोपविण्यात आल्यामुळे मी त्याच सोनं असल्यामुळे जास्तीत जास्त उद्योग आणणार असल्याचे त्यांनी सांगितले . दरम्यान , मंत्री भुमरे यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हणाले की , ते म्हणतात आम्ही गद्दार आहोत . पन्नास खोके घेतले आहे असा आरोप आमच्यावर लावतात . पण आम्ही जी निवडणूक लढवली होती . शिवसेना भाजपा युती करून लढविली होती . निवडणुकीत भाजपचे १०६ आमदार निवडून आले होते . तर आमचे ५६ करणार असून औरंगाबाद जिल्ह्यासाठी भरपूर प्रमाणात निधी खेचून आणणार असल्याचे आश्वासन देत जिल्ह्यात गाव तिथं विकास करणार असल्याचे ते म्हणाले . तसेच औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न , ड्रेनेज लाईन , रस्ते आदी कामे प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले . जिल्ह्यात डीएमआयसी व एमआयडीसी आहे . मात्र , म्हणावे तितके उद्योग आलेले नाही . गल्ली ते दिल्ली आपलेच सरकार आमदार निवडून आले होते . अशावेळी मुख्यमंत्री भाजपाचा व्हायला पाहिजे होता . पण उद्धव ठाकरे यांनी असे न करता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले . यावरून गद्दारी आम्ही केली की उद्धव ठाकरे यांनी केली हे तुम्हीच ठरवा असे ते म्हणाले . माजी खा .. चंद्रकांत खैरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्यावरही त्यांनी यावेळी टिका केली . यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित , शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार , जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे , पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे , सरपंच शिवराज भुमरे , उपसरपंच शिवाजी भालसिंग , माजी सरपंच अंबादास नरवडे , राहुल नरवडे , सुनील मेहेत्रे , जिजा भुमरे , पाचोड खुर्दचे उपसरपंच नितीन वाघ , दिनकर मापारी , विलास गोलाडे , दादासाहेब भिसे , अशोक निर्मळ , आबासाहेब भुमरे आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પોલીસે હાઉસ રેડ કરી ઉમરગામમાં દારૂ ઝડપ્યો
પોલીસે હાઉસ રેડ કરી ઉમરગામમાં દારૂ ઝડપ્યો
'अब लोग कहते हैं बन गया, मिल गया...' निर्मला सीतारमण ने की कांग्रेस की खिंचाई; अमित शाह के चेहरे पर आई हंसी
नई दिल्ली, एनडीए सरकार के खिलाफ विपक्ष के अविश्वास प्रस्ताव पर लोकसभा में गुरुवार को चर्चा हो रही...
હળવદ માં ચારિત્ર્યની શંકાથી પતિ બન્યો દૈત્ય પતીએ કરી પત્નીની હત્યા શું છે રહસ્ય જુઓ ક્રાઈમ ન્યુઝ
હળવદ માં ચારિત્ર્યની શંકાથી પતિ બન્યો દૈત્ય પતીએ કરી પત્નીની હત્યા શું છે રહસ્ય જુઓ ક્રાઈમ ન્યુઝ
અમદાવાદ મતગણતરી ભાજપ 9 અને કોંગ્રેસ 1માં જીત@live24newsgujarat
અમદાવાદ મતગણતરી ભાજપ 9 અને કોંગ્રેસ 1માં જીત@live24newsgujarat
મહેસાણા : વિસનગરમાં રાજકારણનો માહોલ જામ્યો, આરોગ્ય મંત્રી સામે ચૂંટણી લડશે પૂર્વ જિલ્લા ભાજપ પ્રમુખ
ગુજરાત વિધાનસભાની ચુંટણી જેમ જેમ નજીક આવી રહી છે તેમ તેમ રાજકારણમાં ગરમાવો આવી રહ્યો છે. ભાજપે...