अजित पवार यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड -  कोविड-१९ अंतर्गत निधन झालेल्या बुवासाहेब पाटील विद्यालय, सिंदी ता.जि.बीड या खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षक केदार सुभाष दगडू यांच्या कुटूंबियाला शासनाने ५० लाख रूपयाचे विमा सानुग्रह अनुदान मंजुर केले असून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी धनादेशाचे वितरण करण्यात आले.

     यासंदर्भात माहिती अशी की, बीड तालुक्यातील बुवासाहेब पाटील विद्यालयाचे सहशिक्षक केंदार सुभाष दगडू यांचा कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ३८ मे २०२० रोजी मृ्त्यू झाला होता. सदर प्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दि.३० जून २०२२ रोजी शासन आदेशानुसार प्रस्ताव मान्य करण्यात आला. दिनांक ४ जुलै २०२२ राोजी शिक्षण संचालक यांनी सदर आदेशास मान्यता दिली.

    बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या शुभहस्ते ५० लक्ष रूपयाचा विमा सानुग्रह अनुदानाचा धनादेश श्रीमती पार्वती सुभाष केदार यांना वितरीत करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक, अधिक्षक राजेश खटावकर यांची उपस्थिती होती.

    शिक्षणाधिकारी (मा.) डॉ.विक्रम सारुक आणि अधिक्षक राजेश देशमुख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या कुंटूबियांना ५० लाख रूपयाचे विमा कवच मिळाले आहे.