स्विफ्ट कार मध्ये विक्रीस जात असलेला गुटखा शहर पोलिसांनी पकडला

कारसह 2,71,360 रु अंदाजे किंमतीचा मुद्देमाल जप्त

वसमत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनिचा सुंगधीत गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असलेली स्विफ्ट कार शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आसेगाव रोडवर पकडली असून कारसह 2,71,360 रु अंदाजे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व वेगवेगळ्या कंपनिचा सुंगधीत गुटखा हा मानवीय स्वास्थास अपायकारक विषारी घटक आहे हे माहीत असताना सुध्दा स्वताच्या फायद्यासाठी विक्री करण्याचे उद्देशाने वरिल वर्णनाचा प्रतिबंधीत 21,360 रुपयाचा गुटका व

स्विप्ट डिझायर कार अंदाजे

किंमत 2,50,000 सह मिळून आला असून पोलिसांनी कारसह 2,71,360 रु अंदाजे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पो.ह शेख नय्यर यांच्या फिर्यादीवरुन सुनील लक्ष्मण सदावर्ते वय 26 वर्षे व्यवसाय मजूरी रा. पावरलूम वसमत विरुद्ध विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बोराटे करीत आहेत