जनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.बाराशिव वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी संपन्न झाली.
वसमत तालुक्यातील बाराशीव मंदीर परिसरात सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब तसेच प्रमुख अतिथी मा.आमदार चंद्रकांत उर्फ राजुभैया नवघरे व जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजवलंन करून झाले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण सर यांनी केले व कार्यक्रमाची सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले.याच बरोबर पंच कृषितील गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.व तसेच पांडुरंग कदम, प्राचार्य भाऊसाहेब काळे,यादवरावजी कदम यांचा संस्थेच्या वतीने नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.