पैठण: पैठण तालुक्यात कुठेही मुरुम उत्खनन करण्याची परवानगी नसतांना तालुक्यातील गेवराई बाशी शिवारातील गट नंबर 234 मध्ये पोकलँडच्या साह्याने पाझर तलावातच अवैध मुरुम उत्खनन होत असुन भरगच्च मुरुमाने भरलेला हायवा वाहनातून हि अवैध वाहतूक केली जात आहे याबाबत तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी यांना फोनवरून संपर्क साधला असता संबंधीत प्रभारी तहसीलदार शंकर लाड व मंडळ अधिकारी यांनी फोन उचलला नाही. पैठण तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या स्वाती कोल्हे यांना फोनवर संवाद साधला असता मी दोन दिवस सुट्टीवर आहे त्यामुळे मुरुम उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे किंवा नाही मला सांगता येणार नाही. याबाबत तहसीलदार यांना फोन करून विचारुन घ्या असे सांगितले औरंगाबाद येथील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते संस्था यांच्या पत्राचा आधार घेऊन संबंधित मे एस.डी.दौंड ईन्फ्रा प्रा लि.औरंगाबाद यांनी महसूल विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच गेवराई बाशी येथील पाझर तलावातुन पोकलँडच्या साह्याने अवैध मुरुम उत्खनन करून हायवा वाहनातून वाहतूक केली जात आहे.त्यामुळे परवानगी बाबत महसूल विभाग व मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे.