संगमेश्वर :तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात तब्बल ५० वर्ष अविरत कार्य करणारे स्व. नारायण देऊ जायगडे गुरुजी यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त स्व. नारायण देऊ जायगडे (गुरुजी) शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने (दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी) किरबेट येथे कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य प्रामाणिकरण समितीचे सदस्य मा. श्री. संदीप कांबळे आणि रत्नागिरी जिल्हा सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. श्री. संतोष गमरे हे मार्गदर्शन करणार आहेत.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड, किसान साद संपादक हरिश्चंद्र गीते, मुंबईचे उद्योजक विष्णुशेठ रामाणे, देवडे सरपंच बापू शेट्ये, ॲड संदीप ढवळ, किरबेट सरपंच रेवती निंबाळकर, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य एस जी लांडगे पाटील, पोलीस पाटील प्रदीप अडवल यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. 

यावेळी स्व. गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव, उकृष्ठ महिला बचत गट, शेतीनिष्ठ शेतकरी, गुणवंत कामगार, समज सेवक, खेळाडू यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच निराधार विद्यार्थी व नागरीकांना आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहे , अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. आ. दे जायगडे यांनी दिली.

या कृषी मेळाव्यातून स्व. गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव यशवंत धागरे यांनी केले आहे.