औरंगाबाद : जे कर्मचारी मुख्यालयी राहतात त्यांचे कार्यालय प्रमुखांनी शासकीय जागेत किंवा भाडे करारावर राहत असेल तर तसे प्रमाणित करावे . आणि जे कर्मचारी मुख्यालयात राहत नसेल त्यांचा घरभाडे भत्ता रोखण्यात यावा . ही कारवाई पार न पडणाऱ्या विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे मागील काही दिवसापासून मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या . काही काळ थांबलेला मुद्दा आ . प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे . त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटाणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत मुख्यालयी रहा अन्यथा घरभाडे रोखण्याचा निर्णय घेतला आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २० सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की , जिल्हा परिषदच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक अनेक ठिकाणी कर्मचारी कामाच्या वेळेत हजर राहत नसल्याचे समोर आले होते . त्यामुळे सीईओ गटणे यांनी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे . यासोबतच कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन समर्थनीय कारणाशिवाय कर्मचारी मुख्यालयात नसेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे . बायोमेट्रिक बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे