बीड दि.२४(प्रतिनिधी):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती एस.एन.गोडबोले म्हणाले की कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांची मुले जर सांभाळत नसतील तर त्यांना मुलांकडे असे पोटगी मागता येते ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी निर्माण झालेल्या कायद्याविषयी न्यायमूर्ती एस. एन. गोडबोले यांनी सविस्तर माहिती दिली. बीड शहरातील नवी भाजी मंडई परिसरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र बीड येथे आयोजित कार्यक्रमात ५० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तत्वशिल कांबळे या वेळी बोलताना म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालकल्याण समिती बीडचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी ज्येष्ठांच्या विविध योजना याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजू वंजारे कार्यक्रमास सहाय्य शालिनी परदेशी , अभिजित वैद्य, यश वंंजारे, कल्याण गोरे यांनी केले .