कन्नड़ तालुक्यातिल करजखेड़  सर्कल मध्ये या वर्षी शेतकऱ्यांनी मका व कपाशी पिकाच्या लागवडीबरोबरच भुईमुगाचीदेखील लागवड केली आहे . सध्या हे पीक परिपक्व होऊन शेंगा काढणीच्या कामांना शेतशिवारांमध्ये वेग आला असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे . वाळलेल्या शेंगांची या बाजारात सत्तर ते ऐंशी रुपये किलो दराने विक्री केली जाते , तर ओल्या शेंगा या बाजारात सध्या पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहेत . त्यामुळे युवकांनाही एक रोजगार निर्माण झाला आहे . या वर्षी या पिकापासून बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे