आ.धस व आ.आजबे एकाच बाकावर !

आष्टी(प्रतिनिधी)-ज्या पाण्याची योजना कुणालाच माहिती नव्हती ती खुंटेफळ साठवण योजना आ.सुरेश धस यांनी सन 2003-04 साली मंजूर केली अन् तालुक्याला समजून सांगीतली पण तत्कालीन विरोधक असलेले सर्वच नेते म्हणाले आ.धस यांनी आणलेली ही योजना फसवी असून ते तालुक्याला येड्यात काढतात पण आता आ.बाळासाहेब म्हणतात खुंटेफळ उपसा सिंचन योजना लवकर पुर्ण झाली असती पण त्या योजनेचे निघालेले टेंडर आ.धसांनी अडवूण खोडा घातला असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यानंतर पंधरा दिवस आ.धस व आ.आजबे यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते.त्यानंतर आज दि.23 रोजी न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे उद्याटनाच्या मुहूर्तादिवशी आ.धस व आ.आजबे हे एकाच व्यासपीठावरच नाहीतर बाकावर आले अन् या रेल्वेच्या उद्याटनातच आष्टीची उपसा जलसिंचन योजनेचे टेंडर करून लवकर ही योजना पुर्ण करणार असून,आष्टी तालुका दुष्काळमुक्त करणार असल्याचे खुद्द राज्याचे उपमुंख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस यांनीच ग्वाही दिली.

महाविकास आघाडीचे सरकार पायाउतार होण्याचा दोन तीन दिवस आगोदर आ.बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तालुक्याला वरदान ठरणारी खुंटेफळ उपसा सिंचन योजनेसाठी तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी 14 कोटी रूपये मंजूर करून टेडंरही ओपन केले.परंतु हे टेडंर चुकीचे असल्याने त्यावर आरोप घेत टेडंर आ.धस यांनी स्थगीत केले असल्याचा आरोप आ.आजबे यांनी केला.त्यानंतर आ.धस व आ.आजबे यांनी पञकार परिषद घेत परस्परांवर तोंडसुख घेतले.आज दि.23 हा दिवस आष्टी तालुक्याला सुवर्ण दिन लाभला असल्याने आष्टीच्या विकासात भर टाकण्यासाठी न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे सेवा सेवेचा शुभारंभ झाला.या शुंभारभासाठी राज्याचे उपमुंख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये कर्जत तालुक्यातील शेमपुरा येथून उजनीचे बॅक वॉटर चे पाणी उचलून थेट जलद्वाहिनी द्वारे सोडण्याच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठे आश्वासन दिले.व हे काम अडविणार नसल्याचे जाहिर केले.अन् विशेष म्हणजे काल झालेल्या न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे उद्याटनाच्या मुहूर्तादिवशी आ.धस व आ.आजबे हे एकाच व्यासपीठावरच नाहीतर बाकावर आले अन् उपस्थितींच्या भुवाया उंचावल्या.