कन्नड नागद रस्तावरील राज्य महामार्ग ३ ९ वरील सायगव्हान जवळील गडद नदीवरील पूल खचला आहे . यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे . त्यामुळे कन्नड - सायगव्हान - भिलदरी- नागद येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे . सदरील रस्ता हा महामार्ग असल्याने अंत्यंत महत्वाचा असून या राज्य महाम मार्गावर तालुक्यातील आमदाराचे गाव आहे . गडदगड नदीवरील हा पूल गुरुवारी रात्रीच्या पावसात खचला आहे . काही वाहतूकधारकांना सकाळी हा पूल खचला असल्याचे निर्दशनास आले . काही कालावधीत ही माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली . पूल खचल्यामुळे कन्नड- सायगव्हान - भिलदरी - नागद बेलखेडा आदी सह नागद परिसरातील गावांचा कन्नडकडे येणार मार्ग बंद झाला आहे . धुळे - सोलापूर राष्ट्रीय महाम - अनेक रस्ते दुर्लक्षित , तालुक्यातील अनेक पुलांची आणि रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे , कन्नड - अंधानेर- कोळवाडी - वडणेर रस्त्यावरील पूल खचून वर्ष उलटले आहे . कन्नड - चिकलठाण रस्तावरील पूल उघडा पडला आहे . औरळा जेहुर रस्त्याची दयनीय अवस्था आहे . कन्नड - गौताळा नागापूर- चिंचोली असे अनेक रस्ते मागील काही वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहेत . वारंवार रस्त्याची मागणी होऊन सुद्धा हे रस्ते दुर्लक्षित आहेत . आता तरी आमदार उदयसिंग राजपूत या रस्त्यांकडे लक्ष देतील का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . महामार्गावरिल औट्रम घाट वारंवार जाम होत असतो . त्यामुळे वाहतुकीस पर्यायी मार्ग म्हणून कन्नड - नागद - चाळीसगाव असा म वर्ग असून हा पूल खचल्याने आता मोठी सम स्या वाहनधारकांना सहन करावी लागणार आहे . कन्नड वरून पाचोरा - भडगाव जळगांव भुसावळ जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असून जवळचा मार्ग आहे . आता हाच मार्ग बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागणार आहे . कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंह राजपूत हे नागद येथील असून ते सुद्धा याच रस्ताने ये - जा करत असतात . मात्र त्यांच्या तोंडून या पूलासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही . हा पूल जीर्ण झालेला असूनही याकडे दुर्लक्ष का करण्यात आले ? आमदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत का ? आमदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा वर वचक नाही का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . कन्नड हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासकीय निमशासकीय कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी असते . या पुलाचे काम लवकरात लवकर करावे , अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे