अकोला दिनांक 23 सप्टेंबर 2022

जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्याची दिव्यांगाप्रती असलेली कर्तव्य तत्परता पाहून त्यांचे कौतुक होत आहे. दोन महिला अत्यंत गरीब परिस्थितीतील अपंग दिव्यांग असलेल्या संगीता फुलंबरकर व किरण दिघेकर या अकोट वरून जिल्हा परिषद अकोला येथे आले असता त्यांची दयनीय अवस्था पाहून समाज कल्याण अधिकारी श्री ज्ञानेश्वर पुंड यांनी चौकशी करून दिव्यांग महिलांना बीज भांडवलाची केस मंजूर करून दिली. एका महिलेची एक लाख 50 हजार रुपये तर दुसऱ्या महिलेची दोन लाख 50 हजार रुपये अर्ज  मंजूर झाल्यामुळे दोन्ही महिलांचे मन आनंदाने भरून आले व उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.