*दोन हजार शिवसैनिक दसरा मेळाव्या साठी मुंबईला जाणार-माजी आ लहाणे*

*शिंदे शिवसेत प्रवेश केलेल्या माजी आ लहाणे यांचा सत्कार*

न्यूज रिपोर्टर जिंतूर प्रतिनिधी माबुद खान

पाथरी:-येत्या दसरा मेळाव्या साठी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या साठी पाथरी,मानवत,सेलू,परभणी ग्रामिण,सोनपेठ तालुक्यातील दोन हजार शिवसैनिक शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या साठी मुंबईला जाणार असल्याचा निर्धार माजी आ हरीभाऊ लहाणे काका यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पाथरी येथील बैठकीत पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला.

पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हरीभाऊ काका लहाणे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १२ सप्टेबर रोजी पैठण येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने शुक्रवार २३ सप्टेबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजीत केली होती. या प्रसंगी माजी आ लहाणे बोलत होते. आगामी काळात पक्षसंघटन वाढवण्या साठी जास्तितजास्त वेळ देणार असल्याचे ही ते या वेळी बोलतांना म्हणाले.या वेळी उपस्थित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी 

माजी आ लहाने यांचा सत्कार केला.

या वेळी तालुकाध्यक्ष गोविंदराव गायकवाड, आशोकराव गिराम, विठ्ठलराव रासवे, सुधाकर गोंगे यांची उपस्थिती होती.

या वेळी भागवतराव शेळके,करण वाकनकर, संदिपान कोल्हे, किरण उर्फ दत्ता घुंबरे, बाबा टेकाळे, चक्रधर चिंचाने,गुलाम अन्सारी, जय गिराम,अंकुश घुंबरे,आशोकराव शिंदे,साथिराम थोरे, फुलचंद टेकाळे,अनंता दिवटे,सुदर्शन घुंबरे,अमोल घुंबरे या पदाधिका-यांनी माजी आमदार हरीभाऊ काका लहाणे यांना पुढिल कार्या साठी शुभेच्छा देत सत्कार केला.