विहामांडवा मुक्कामी फेरीसह तीन वेळा सुरू असलेली औरंगाबाद पाचोड विहामांडवा मार्गेची एसटी बस कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली आहे . आता कोरोना आटोक्यात आला असून , देखील सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे . औरंगाबाद विहामांडवा मुकामी राहणारी औरंगाबाद विहामांडवा एसटी बस बंद असल्यामुळे औरंगाबाद विहामांडवा - पाचोड दरम्यानच्या सर्वच गावातील सर्वसामान्य प्रवासी ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक , दिव्यांग यांच्यासह शाळा व कॉलेज तसेच विविध व्यवसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची अतोनात गैरसोय होत आहे . यामुळे प्रवाशांची गैरसोय औरंगाबाद येथील जिल्ह्याचे ठिकाणी अनेक प्रलंबित कामे खोळंबली आहेत . संबंधित एसटी बस सेवा सुरु करण्यासाठी विहामांडवा गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा विभागीय नियंत्रक औरंगाबाद , आगार प्रमुख एसटी यांच्यासह नियंत्रक यांना बस सुरू करण्यासाठी मागणी केली आहे , परंतु संबंधित महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करत आहे . याच सेवेप्रमाणे मध्यंतरीच्या विहामांडवा औरंगाबाद अशी बस सेवा आगाराने सुरू केली होती मात्र संबंधित आगाराने एसटी बस बंद केल्यामुळे सर्वच प्रवाशांची गैरसोय होऊन प्रवाशांना खाजगी वाहनाने अधिकची रक्कम खर्च करून आर्थिक बोजा सहन करून प्रवासात करावा लागत आहे संबंधित बस सेवा पुर्ववत करावी , अशी मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांतून होत आहे