केंद्रीय मंत्री शांतनु ठाकुर यांच्या हस्ते उत्तमराव दगडू (दादा) यांचा सत्कार
हिंगोली प्रतिनिधी/गोपाल सातपुते
भारत सरकारचे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जल मार्ग राज्यमंत्री शांतनु ठाकुर यांनी आज दै.गाववालाचे संपादक उत्तमराव दगडू (दादा) यांचा हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात भाग घेतलेले व लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी कालावधीत 17 महिने कारावास भोगलेले दै.गाववालाचे संपादक उत्तमराव दगडू (दादा) यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते व पर्यटन विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांतराव देशपांडे नाना यांच्या निवासस्थानी एका खास कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.
यावेळी केंद्रीय मंत्री शांतनु ठाकुर यांनी दै.गाववालाचा अंक दौर्याच्या घाईगडबडीत असतानाही काळजीपुर्वक वाचन करुन अंकाचा दर्जा छपाई व मजकुर याचे कौतुक करुन मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातुनही इतका दर्जेदार अंक निघु शकतो याबद्दल गाववाला परीवाराचे कौतुक केले व पत्रकारीतेत 93 व्या वर्षीही अखंडपणे कार्यरत असलेल्या उत्तमराव दगडू (दादा) यांच्या कार्याचा गौरव केला.