कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील.श्रीकृष्ण वाडीतिल गेले १० ते १५ वर्षापासुन रस्तांच्या पतिक्षेत. अनेक वेळा पुढारांना या श्रीकृष्ण वाडीच्या रस्तांची लोकांनी त्याच्याकडे समस्या मांडण्यात आली पण कोणत्याही राजकीय पुढारांनी या रस्त्यांची दखल घेतलेली नाही... हा पेट्रोल पंपापासुन ते श्रीकृष्ण वाडी पर्यंत अडीच ते तीन किलोमीटरचा हा श्रीकृष्ण वाडी पर्यंत रस्ता आहे ... ती वस्ती ७० ते ८० घरांची आहे.. मुलांना शाळेत जाताना व येताना गुडघ्या ईतक्या खड्यातुन प्रवास करावा लागत आहे .या अगोदर ही बर्‍याच वेळी त्या रस्त्यांचे उद्घाटन ही झालेले आहे.. पण अद्यापही आजुन या रस्तांचे काम चालु झालेलं नाही. हा रस्ता जामडी जहागीर या गावालाही जोडल्या जातो.प्रशासनाला वंचित बहुजन आघाडी तर्फे या श्रीकृष्ण रस्तांची मागणी करण्यात येत जर हा रस्ता लवकरात लवकर नाही करण्यात आलेस. वंचित बहुजन आघाडी तर्फे येणाऱ्या काळात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला