माजलगाव :- माजलगाव येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉ.दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ बुडाल्याची व यांच्या मृतदेहाची शोध घेत असतांना कोल्हापूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर केडीआरएफचे एक जवान शहीद झाले हया दोन्ही घटना दुःखत असुन पुन्हा अशी घटना न घडाव्यात ह्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत तसेच मासे टेंडर रद्द करुन प्रशासन बसवावे अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

           अनेक जण गेल्या कित्येक वर्षांपासून माजलगाव तलावात पोहण्यासाठी जातात.हया धरणावर कुठलाही बंदोबस्त नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तटरक्षक नाही,धरणाची माहिती देणारी बॅनर नाहीत तसेच माजलगाव धरणामध्ये मासे पकडण्यासाठी ज्या विविध संस्थांना टेंडर दिले जाते त्या टेंडर मुळे भांडण पण झालेली आहे हया टेंडर चे काम करतांना मास्यांना धरण्यासाठी जाळी टाकतात हया बेकायदेशीर टाकलेल्या जाळ्यात डॉक्टरचा मृतदेह सापडायला गेलेल्या जवानाचा मृत्यू हा दुःखत आहे अश्या जबाबदार मासे टेंडर वर कार्यवाही करुन टेंडर बंद करा तसेच भोई समाजाचा विचार करून मासेमारीसाठी वेळ, नियम अटी लागू करून प्रशासन बसवावे अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे