स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर प्रचंड उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, शारदा महाविद्यालय व मॉडेल इंग्लिश स्कूल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत शारदा प्राथमिक शारदा माध्यमिक शारदा कनिष्ठ महाविद्यालय व मॉडेल इंग्लिश स्कूलच्या वतीने परभणी शहरात रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. शारदा महाविद्यालय ते जिंतूर रोड, उड्डाणपूल, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, शिवाजी चौकापासून पुन्हा शारदा महाविद्यालयापर्यंत निघालेल्या रॅलीला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार बिराजदार यांच्या हस्ते तिरंगा दाखवून सुरूवात झाली.यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश भालेराव, मुख्याध्यापक जैस्वाल, प्राचार्य संजय जोशी व मुख्याध्यापिका कंधारकर,उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीचे प्रभारी प्रा.डॉ. सुनील बल्लाळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सचिन खडके, प्रा. डॉ. उज्वला जगताप, प्रा. डॉ. नवनाथ सिंगापूरे यांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शारदा प्राथमिक शारदा माध्यमिक शारदा उच्च माध्यमिक व शारदा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच मॉडेल इंग्लिश स्कूल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व शिक्षक वृंद प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. काझी कलीमोददीन यांनी आपल्या संचासह राष्ट्रभक्तीपर गीत गात रॅली मध्ये उत्साह निर्माण केला. रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. नितीन बावळे, प्रा. डॉ. रत्नाकर कांबळे, प्रा. डॉ.संतोष नाकाडे, प्रा. डॉ. हनुमंत शेवाळे, प्रा. शाम पाठक, प्रा. डॉ. वैशाली देशपांडे, प्रा. डॉ.ए.बी. शिंदे, प्रा डॉ.एस. एन. कुलकर्णी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा. डॉ. दत्ता चामले, प्रा. डॉ. सुरेश खिस्ते,प्रा. डॉ. अविनाश पांचाळ, प्रा. डॉ. रेणूकादास देशपांडे, प्रा. डॉ. नुरूल अमीन, प्रा. डॉ. गोपाळ पेदापल्ली, प्रा. डॉ. गजानन मरगीळ प्रा. गुज्जर, तुकाराम पवार, भगवान रिठाड, राजाराम मुत्रटकर, राजकुमार नागुल्ला, जावेद शेख,तनुजा रासवे, गायकवाड, राजगुरू यांच्यासह संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.