अनैतिक सबंध ला विरोध केला म्हणून पोटच्या मुलानेच केला आई चा खून .
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील मैत्री पार्क बिल्डिंगमध्ये घडली आहे.खुद्द पोटच्या मुलानीच आईचा बेल्टाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक देखील केली आहे.
मृत अमरावती अंबिकादास यादव वय 58 वर्ष यांचा मुलगा कृष्णा अंबिकादास यादव यांच्यासोबत राहत होत्या. याच ठिकाणी राहणाऱ्या बबीता पलटूराम यादव हिच्यासोबत मुलगा कृष्णा यादव याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आई अमरावती हिला मिळाली होती. ही माहिती मिळताच तिने या अनैतिक संबंधाला तीव्र विरोध केला. त्यांनी आपला मुलगा कृष्णाची समज देखील काढली होती. पण तो आईचे ऐकण्यास तयार नव्हता यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
बुधवारी रात्री पुन्हा एकदा कृष्णा आणि त्याच्या आई मध्ये जोरदार वाद झाला.याच वादाचा राग डोक्यात ठेवून मुलगा कृष्णा यांनी अमरावती यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बबीता हिच्या सहाय्याने बेल्टने आई अमरावती यांची गळा आवळून हत्या केली. अमरावती यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. तर जगदीश यादव यांच्या तक्रारीनुसार मुलगा कृष्णा आणि बबीता या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना या हत्येच्या गुन्हा प्रकरणी अटक केली आहे. पोलीस या प्रकारणाचा अधिक तपास करीत आहेत.