चाळीस गाव: हात पकडून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना १ ९ रोजी रात्री गांधलीपुरा भागात घडली . याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीती पसरली आहे . गांधलीपुरा भागातील चुना घाणी परिसरातील १५ वर्षीय तरुणी १ ९ रोजी रात्री दुकानावर मच्छर अगरबत्ती घेण्यासाठी गेली होती . दुकानावरुन ती घाबरत घाबरत घरी आली असता , कुटुंबियांनी तिला घाबरण्याचे कारण विचारले . त्यावेळी दुकानदार शोहेब शेख रफीक ( रा . गांधलीपुरा ) याने अगरबत्ती घेण्यासाठी पैसे देताना उजवा हात पकडून विनभंग केल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितले . त्यानंतर पीडित मुलीचे वडील याबाबत जाब विचारयला गेले असता , त्याठिकाणी संशयित शोएब शेख रफीक , फारुश शेख अन्वर , शेख फिरोज शेख अन्वर व राजा शेख अन्वर यांनी फिर्यादी व इतरांना शिवीगाळ केली . तसेच संशयितांनी तरुणीची बदनामी करण्याची धमकी दिली . याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध कलम ३५४ , ५०४ , ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करत आहे