वाघोली (ता:हवेली) येथील वाघेश्वर मंदिरात सकाळी पहाटे पासुनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच वाघेश्वर मंदिर श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.वाघोली येथील वाघेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.त्या पार्श्वभूमीवर वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील तसेच उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांनी सांगितले की देवस्थान ट्रस्ट,महापालिका कर्मचारी,लोणीकंद पोलिस व ग्रामस्थांनच्या वतीने चोख तयारी केली गेली आहे.वाघोली येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे नगर महामार्गालगत असल्याने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते.यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडी होऊ नये तसेच भाविकांनाही कोणताही त्रास होऊ नये यासाठी लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात शिवशंकराच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जात. यावर्षी १,८,१५, २२ ऑगस्टला असे चार श्रावणी सोमवार येत आहेत.प्रथम श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे साहित्य वाटप करत महिला भाविकांना तुळशीचे रोप वाटप करून, पुढच्या श्रावण महिन्यांत पर्यंत जे रोपांची लागवड करुन वाढ करतील अशा दहा महिलांना मानाची पैठणी व भेट वस्तू अष्टविनायक मित्र मंडळ व विक्रम लक्ष्मीताई प्रकाश वाघमारे मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
यावेळी लोणीकंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, रामकृष्ण दळवी, रितेश काळे, मा. जि.प सदस्य रामदास दाभाडे,पत्रकार सुरेश वांढेकर, विक्रम वाघमारे,पंकज काळे, शिवाजी सातव, प्रमोद काळे, योगेश सातव, तुषार जानराव, प्रणव सातव, बबलू गोरे, आनंद जोशी सह इतर कार्यकर्ते व भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.