उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकट्या जळकोट तालुक्यासाठी जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी दिला असून यामुळे या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे गेल्या अडीच वर्षाच्या काळात विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास बाळगून तालुक्यातील गावागावात विविध विकास कामासाठी निधी दिला असून यापुढेही मी सदैव तुमच्या सेवेसाठीच रात्रंदिवस काम करेन अशी ग्वाही माझी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी आतनूर येथे ग्रामस्थांना दिली त्या आतनुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमी कार्यक्रमात सोहळ्याप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमास जळकोट राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे माजी उपसभापती बाळासाहेब मलापल्ली शिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्राम टाले ,तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मडेवार, आतनुर चे  सरपंच चंद्रशेखर पाटील, मंगरूळचे सरपंच मेहता बेग ,गजानन दळवे पाटील ,उस्मान मोमीन, संजय हासुळे पाटील ,रामराव राठोड आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार बनसोडे यांनी अतनूर चे सरपंच चंद्रशेखर  पाटील यांचे गावच्यया विकासासाठीची धडपड पाहून मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले आतनूर गावाला निधी कमी पडू देणार नाही त्यासोबतच या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही जळकोट च तहसीलदार सुरेखा स्वामी यांना दिले  गेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी पहिल्यांदा कृषी मंत्री सत्तार यांना निवेदन देऊन मागणी केली होती मात्र हे विरोधी पक्षाचे सरकार व मी राष्ट्रवादीचा आमदार असल्याने माझा मतदारसंघ योजनेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आला आहे मात्र मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे तुमच्यासाठी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार संजय बनसोड यांनी दिले याप्रसंगी आतनूर जळकोट येथील विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जलजीवन मिशनचे भूमिपूजन माझी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पूजन करून श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.