हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले असलेल्या इंद्रधन परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे येलदरी धरण 100 टक्के भरले आहे त्यामुळे आज धरण प्रशासनाच्या वतीने धरणाचे 10 दरवाजे उघडून नदी पूर्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तसेच पूर्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.येलदरी धरण हे शंभर टक्के भरले असून काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी सहा दरवाजे उघडण्यात आले होते तर आज दिनांक 19 सप्टेंबर वार सोमवारी रोजी येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.