औरंगाबाद : करमाड ते सिडको सिटी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना काल रविवारी वरुड फाट्यावर घडली. काही तांत्रिक कारणामुळे या बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.  ही करमाड वरून सिडको बस स्थानकाकडे प्रवाशांना घेऊन जात असतानाच चाकामधून अचानक आवाज आला. आवाच येताच चालकाने सतर्कता बाळगत प्रवाशांना खाली उतरवले.त्यानंतर उपलब्ध मेकॅनिकला मदतीसाठी फोन लावला. चालकाने गाडी बंद करून परत सुरू केल्यानंतर इंजिनला आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर चालकाने सिलिंडर वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न केले. मात्र, ही आग वाढली होती. दरम्यान, सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. दरम्यान, सदर बसची नियमित सर्व्हिसिंग मागील महिन्यात टाटाच्या सर्विस सेंटर येथे झाली होती. आता कंपनीकडून तपासणी झाल्यानंतर नेमकी ही आग कशामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही