जोधपुर: ट्विटरवर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असुन या व्हिडीओमध्ये एक इसम चारचाकी गाडीला कुत्र्याला दोरीने बांधून कारसोबत पळवत असल्याचे दिसत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असुन या व्हिडीओमधील कारच्या मागे धावणारा कुत्रा फारच थकलेला दिसत असुन कार चालवणाऱ्या इसमाचे नाव डॉ. रजनीश गलवा असे सांगण्यात येत आहे.
याबाबत एका युजरने म्हटलंय, ‘कार चालवणारा ‘जनावर’ किती असंवेदनशील आहे.’ दरम्यान, कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने असे कृत्य का केले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. हा कुत्रा दोरीमधून सुटण्याच्या प्रयत्नात असुन हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकालाच वाईट वाटले आहे. नेटकरी कार चालकावर टीका करत आपला संताप व्यक्त करत असुन मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक डॉ. रजनीश गलवा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.