गावात रस्ताच नाही, मृत्यूदेह बैलगाडीतून नेहत गाठलं घर..
"दावरवाडी तांडा; महिलेचा मृत्यूदेह बैलगाडीतून घेऊन जाव लागल्याची नामुष्की"
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील दावरवाडी तांडा हा पैठण-पाचोड राज्यमार्गा पासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या दावरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दावरवाडी तांडा येथील एका महिलेनी (दि.१७)रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या महिलेवर अंतसंस्कार करण्यासाठी घरी घेऊन जाण्यासाठी रस्ता रस्त्यामुळे त्या महिलेचा मृत्यूदेह बैलगाडीतून घेऊन जाव लागल्याचे नामुष्की येथील राठोड कुटुंबातील नागरीकांवर आली.
याविषयी सविस्तर माहीती अशी की,दावरवाडी तांडा ता.पैठण येथील लिलाबाई सुभाष राठोड यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळून शनिवारी सकाळी विषारी औषध घेतले होते.त्यांनी औषध प्राशन केल्याचे घरातील नातेवाईकांच्या लक्षात आले असता त्यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना घेऊन जायचं ठरवलंय मात्र दावरवाडी तांड्यावरून बाहेर जाण्यासाठी चक्क गुडघे ऐवढला चिखल तुडवत जावे लागत आहे.या तांडावर रस्ता नसल्यामुळे गावातून एकही वाहन बाहेर जात नव्हते त्यामुळे दावखान्यात नेहण्यासाठी गावातील काही नागरिकांनी बैलगाडी जुपवून बैलगाडीतून लिलाबाई राठोड यांना गावाबाहेर आणले आहे. या तांड्याव अजूनही पक्के डांबरी रस्ते झाले नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राज्यभरात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं पसरत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अद्यापही रस्त्यांअभावी लोकांची गैरसोय होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.आमदार, खासदार लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येतात, आमच्या समस्या अजूनही कायम असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी या गावातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावां केला. तरीही अद्याप पक्का रस्ता मिळाला नाही.आता मुख्यमंत्री साहेबांनी ग्रामीण भागातील रस्त्याकडे देखील त्याने लक्ष द्यावं, अशी आर्त हाक या भागातील गावकऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी रस्ता बनवून देऊ अशी आश्वासने दिली होती मात्र ती आश्वासने हवेत विरल्याचे दिसते, असाही आरोप या गावकऱ्यांनी केलं आहे.