कोराडी दिनांक 18 सप्टेंबर अखिल भारतीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय चेतन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येत बंजारा सेनेच्या कार्यकर्त्यांना आज रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केला.
बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते प्रयत्न करतील असा विश्वास माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालय पक्ष प्रवेशासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी माननीय श्री चेतन म्हणालेत आम्ही मोठ्या विश्वासाने राष्ट्र नेत्यावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बावनकुळे यांनी बंजारा सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे दुपट्टा घालून स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्यात