लिंबगाव येथे जल जीवन मिशन योजनाच्या कामाची पाहणी
पाचोड (विजय चिडे)
पैठण तालुक्यातील लिंबगाव येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २३ लाख रूपये निधीमधून सुरू असलेल्या 'हर घर नल हर घर जल' पाणी पुरवठा काम व विविध योजनेच्या आदी कामांची जिल्हा परिषद छ्त्रपती संभाजीनगरचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी माहीती घेऊन पाहणी केली.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजी असोले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक घुगे,पंचायत समितीचे कक्ष अधिकारी निकम, विस्तार अधिकारी दशरथ खराद, कनिष्ठ अभियंता के.एस.शिंदे, भालचंद्र दाणेकर, मनिष पाटील, ओमर शेख, सौरव श्रीवास्तव, अविनाश चपडे,विजय वैष्णव, पुष्कर पाटील, निखील जाधव, स्वच्छ भारत मिशनचे संतोष जाधव, अनिता तायडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबुराव पडूळे,सरपंच सीता दादासाहेब भिसे,उपसरपंच कुंता वसंत पवार ,ग्रामपंचायत सदस्य पुंजाराम वाव्हळ, शिवाजी वाव्हळ, रामेश्वर पडूळे, दत्तात्रय हिंगले, शरद लोंढे, सोमनाथ राऊत, तुकाराम लोहकरे अंगणवाडी सेविका सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.