परभणी: ता.18- वीर सावरकर विचार मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यां करता असलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत चि. शुभम जनार्दन पाचणकर हा प्रथम, चि.प्रशांत सुधाकर शिंगाडे हा द्वितीय तर, चि. कुंडलिक तुकाराम घाटोळ याने तृतीय क्रमांक पटकावला. 

याशिवाय चि. गोविंद मारोतराव कोपणार व कु. अनष्का सुरेश हिवाळे या दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवसात सावरकर विचार मंचातर्फे या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी प्रमुख वक्ते संस्कार भारतीचे महामंत्री आशुतोष अडोणी यांनी

भारताच्या सैनिकीकरणाचे आवाहन ही स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची महान दूरदृष्टी होती. याच दृष्टीकोनातून त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद फौजेचे नेतृत्व करण्याचा सल्ला दिला होता. लेखण्या मोडून सैन्यात भरती होण्याचे त्यांचे आवाहन इंग्रजी सत्तेला शस्त्रानेच उत्तर देण्याची पूर्वतयारी होती असे प्रतिपादन परभणीत दिलेल्या व्याख्यानात केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी नागरी सह. बँक मर्या. छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष किशोर शितोळे हे अध्यक्षस्थानी होते.

पहिल्या तीन क्रमाकांना अंदमानची मोफत सहल बक्षिस म्हणून करता येणार आहे. तर उत्तेजनार्थ बक्षिसधारकासह सर्व विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वाटप मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

पुढे बोलताना अडोणी म्हणाले की, वीर सावरकर हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते त्यांनी क्रांतिकार्याला दिलेले सैद्धांतिक अधिष्ठान हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. ब्रिटिशांनी 858 चा कायद्याने शास्त्र बंदी कायदा करुन भारतीयांकडून शास्त्र काढूनघेतले होते. त्यामुळे शास्त्रही झालेला भारतीय समाज त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हता अशा वेळी अर्ज विनंत्या व अहिंसेचा मार्ग स्वातंत्र्य देऊ शकत नव्हता म्हणून सावरकर एका ठिकाणी लिहितात तेव्हा लोकतंत्र संविधान अस्तित्वात नसते तेव्हा शांततापूर्ण मार्गाने सत्ता परिवर्तन किंवा क्रांती ही केवळ थट्टा ठरते म्हणूनच त्यांनी सशस्त्र क्रांतीची भूमिका घेतली होती. शस्त्र आणि शास्त्र ही दोन साधने राष्ट्राच्या उभारणीत मोलाची असतात. नेमकी तीच इंग्रजांनी भारतीयाकडून काढून घेतली होती. इंग्रजी शिक्षण पद्धतीने या देशाच्या संस्कृतीवर सभेपासून हिंदी माणसाची नाळ तुटली आणि आपण गुलामीत अडकलो. आम्ही काही लढाया हरलो आहोत हे सत्य आहे पण एक सांस्कृतिक राष्ट्र म्हणून हजारो वर्षांपासून अस्तित्वात होतो आजही आहोत ही सुध्दा त्यांच्या क्रांतिकार्याची सैद्धांतिक बैठक होती. सावरकरांनी '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' आणि 'सहा सोनेरी पाने ' ही दोन पुस्तके लिहून भारताच्या तेजस्वी इतिहासाचे दर्शन भारतीयांना घडविले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी ही पुस्तके जरुर वाचावीत असा सल्लाही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सावरकारांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ती केवळ मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी. त्यांचे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र ही प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर वाचावे. सावरकर हे अष्टपैलू नेते होते. त्यांनी सामाजिक समरसतेचे व जातीनिर्मुलनाचे कार्यही अलौकीक होते. स्वातंत्र्योतर राजकारणात हिंदुमहासभा पक्ष निर्माण करुन त्यांनी मोठे कार्य केले. तरुणाईला दिशा देण्याची मोठी ताकद सावरकर विचारात आहे असे सांगून अडोणी यांनी वीर सावरकर मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

दरम्यान कार्यक्राचे प्रास्ताविक मंचाचे अध्यक्ष राजेंद्र मुंडे यांनी केले. पाहुण्यांचा परीचय रमेशराव गोळेगावकर आणि प्रशांत खरवडकर यांनी करुन दिला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्नेहल पाठक माजलगाव, यांच्यासह श्री राम चव्हाण नांदेड, प्रा. डॉ. अनिल मुंढे अहमदपूर, व प्रा. अमित राऊत अंबड, यांनी केले होते. कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप करताना किशोर शितोळे म्हणाले की वीर सावरकरांचे जीवन हे धगधगते यज्ञकुंड होते. त्यांचे हिंदुत्व जाज्वल्य व सर्वसमावेशक होते. त्यांचे व्यक्तीमत्व असामान्य असून असा दिला देशभक्त, क्रांतीकारक होणे नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार क्रांती दैठणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वीर सावरकर मंचाच्या सर्व परिश्रम घेतले.