परभणी.हंगामातील_प्रतिकूल_परिस्थिती जिल्ह्यात सुरवातीला सततचा पाऊस व मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सततच्या पावसामुळे आगोदरच कमकुवत असणारे पिक पावसाच्या खंडामुळे बऱ्याच महसूल मंडळात सोयाबीन व इतर पिके वाळून जात आहेत. एखाद्या मंडळात 21 दिवसांचा पावसाचा खंड पडला तर पंतप्रधान पिक विमा योजनेतील 'हंगामातील प्रतिकूल परिस्थिती' या निकषाचा आधार घेऊन कृषी व जिल्हा प्रशासनाने सूचना काढणे गरजेचे असते. सूचनेनंतर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी संयुक्तरीत्या त्या त्या महसूल मंडळात दौरा करतात. दौऱ्यामध्ये पिकाच्या परिस्थितीत मागील 5 वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता वाटली तर समिती पिकविमा कंपनीला पिक विमाच्या 25% अग्रीम रक्कम देण्याची आदेशित करते. त्या सर्व नियमाचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या व शेतकरी संघटना शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मागणी केली.या शिष्टमंडळात भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, श्री प्रभाकरराव लंगोटे, श्री पांडुरंगराव सोळंके, शेतकरी संघटनेचे श्री विशंभरराव गोरवे पिकविमा चळवळीचे मार्गदर्शक श्री हेमचंद्र शिंदे उपस्थित होते.