मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने विविध कार्यालयात ध्वजारोहण 

औंढा नागनाथः- शहरात हुतात्मा स्मारक व नगरपंचायत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण नगराध्यक्ष कपिल खंदारे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्याधिकारी वैजनाथ भालेराव, अविनाश चव्हाण, महादेव बळवंते, विजय महामुने, अनिल नागरे, सतीश रणखांबे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .औंढा नागनाथ येथील नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष राम नागरे यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे सचिव सीताताई नागरे,प्रदुग्न नागरे, उद्धव नागरे ,मुख्याध्यापक इंगोले ,प्राचार्य ज्ञानेश्वर लांडे, सचिन जाधव, अंबादास वाव्हुळे सह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते औंढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण गटविकास अधिकारी सखाराम बेले यांच्या हस्ते झाला .यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक खोकले,गटशिक्षणाधिकारी सुरेश सोनुने , मनोज कांबळे, आनंद पुरी, रवींद्र शीलवंत ,मनोहर तुमराम, संतोष काळे ,सर्जेराव पंडित, चक्रधर तुडमे यांच्यासह पंचायत समिती मधील कर्मचारी उपस्थित होते.औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद प्रा शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण मुख्याध्यापक शिवाजी मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला .यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल दंतवार ,अनिल देशमुख, अर्चना रामगिरे , दत्ता शेगुकर ,वेदांत शिंदे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते .