अकोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरांमध्ये "सेवा पंधरवडा" कार्यक्रम शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 पासून ते 02 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार अशी माहिती प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर , आमदार हरीश पिंगळे , महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, अपंगांना मदत करणे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरणे देणे ,टीबी झालेल्यांना मदत करणे,

जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन व कार्य याविषयी पक्षातर्फे विविध ठिकाणी प्रदर्शनी लावण्यात येतील

देशाची एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करतील ,

असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.