बीड (प्रतिनिधी) बीड येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात दिनांक 16 सप्टेंबर 2022, शुक्रवार रोजी ओझोन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बंकटस्वामी महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ.जे.डी. चव्हाण, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एसएस., भूगोलविभाग प्रमुख डॉ. विष्णू सोनवणे, डॉ. वाजेद बेग यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. जे.डी.चव्हाण यांनी 16 सप्टेंबर हा दिवस संयुक्तराष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय ओझोनदिन म्हणून साजरा केला. पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो व जीवसृष्टी सुरक्षित आहे. ओझोन वायूचे जतन करणे ही काळाची गरज आहे. ओझोन क्षयामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे व पर्यावरणात बदल घडून येत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने ओझोन थराचे जतन करण्याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करावी व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिर्झा वाजेद बेग यांनी तर आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. विष्णू सोनवणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.