बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे नुकसान होऊनही नव्या शासकीय नियमानुसार मदत मिळालेली नाही. पीकविमा तक्रारी करूनही कंपनी सर्व्हे करत नाही. एकटया बीड तालुक्यात 21 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. लाखो तक्रारी पेंडिंग असून सगळा गोंधळ कारभार पीकविमा कंपनीने लावला असून येत्या 2 दिवसात 10 हजार शेतकऱ्यांची निवेदने शेतकऱ्यांची प्रश्ने निकाली लावावीत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी सांगितले आहे.

 बीड जिल्ह्याला प्रचंड पाऊस होऊनही नुकसानभरपाई दिली गेली नाही. ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्याने सोयाबीनचे नुकसान झाले त्याबाबत अग्रीम सर्व मंडळांना दिला गेला नाही. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व शासनाची नुकसानभरपाई मिळणे आवश्यक असताना शेतकऱ्यांवर हे सरकार दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री अतुल सावे हे शेतकऱ्यांचे प्रश्न देखील समजून घेत नाहीत. त्यामुळे 10 हजार शेतकऱ्यांची निवेदने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असून त्यांनी विशेष बैठक लाऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.