बीड (प्रतिनिधी) ये रे ये रे पावसा नगराध्यक्ष आमदाराने खाल्ला रस्त्याचा पैसा बीड शहरातील रस्ते किती ख़राब झाले जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झालेले आहे शिवाजी महाराज चौक ते बालेपीर चराटा फाट्यापर्यंत रस्ता किती ख़राब झाला या रस्त्यावरुन जिल्हाधिकारी साहेब, माजी मंत्री.जयदत्त क्षीरसागर, आ.संदीप क्षीरसागर,नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा सतत ये जा असून यांना ख़राब रस्ता दिसत नाही का? का जानून बुजुन बीडच्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हा रस्ता तात्काळ बनवावा अशी मागणी लोकसेना संघटना करत आहे,नगर रोडवर न्यायलय,जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील,पंचायत समिती,जिल्हापरिषद,एल.आय.सी,नेहरू युवा केंद्र, बँक,रजिस्ट्री ऑफिस, ट्रेझरी ऑफिस, जिल्हा कारागृह, महिला व बाल कल्याण ऑफिस, पोलिस मुख्यालय,बांधकाम विभाग,शाळा महाविद्यालय,आय.टी.आय,दवाखाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृह,चंपावती क्रीड़ा मंडळ,हॉस्टल,विक्रीकर भवन, दारू बंदी ऑफिस, ग्रंथालय ऑफिस, वसंतराव विकास महामंडळ अशा शेकडो सरकारी खाजगी ऑफिस असून माजी मंत्री,आमदार,नगराध्यक्ष व जिल्हाधिकारी यांचे घर असून सुद्धा शहराचे नगराध्यक्ष व आमदार यांचे या नगर रोडकड़े एवढे दुर्लक्ष का? या भागामध्ये माणसं राहत नाही का,या प्रश्नाचे उत्तर दोघा काका पुतन्यांनी जनतेला द्यावे अशी मागणी लोकसेना प्रमुख ॲड.प्रा.इलियास इनामदार यांनी केली असून शाहू नगर मोमिन पूरा इस्लाम पूरा मोहम्मदीया कॉलनी शहीनशाह नगर जूनाबाजार कारंजा रोड भाजी मंडई बुंदेल पूरा अजीज पूरा शहरातील अनेक रस्त्यांची हिच अवस्था आहे शहरात जिकडे तिकडे घानाच घान आहे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे त्यांचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा कारण मोकाट कुत्रे लहान मुलांना चावत आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेवून निवेदन देवू व लवकर सम्बंधितांना जिल्हाधिकरी यांनी निर्देश देवून कामे करुन घ्यावी नसता लोकसेना संघटना जनआंदोलन उभारणार असा इशारा लोकसेना प्रमुख ॲड.प्रा.इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.