औंढा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून चित्ता प्राण्याविषयी जनजागृती कार्यक्रम
चित्ता प्राण्याविषयी वनपाल संदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना दिली माहिती
औंढा नागनाथः- येथील माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी भारतामध्ये चित्याची पुनरावृत्ती जनजागृती कार्यक्रम वनपरीक्षेञ अधिकारी कार्यालयाच्या वतीने दुपारी दोन वाजता घेण्यात आला होता. विभागीय अधिकारी बाळासाहेब कोळगे व वनपरीक्षेञ अधिकारी कुंडलीक होरे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दीपक राठोड हे होते .कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वनपाल संदीप वाघ हे होते.
वनपाल संदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना चित्ता या प्राण्याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. आफ्रिका देशातील नामबिया या शहरातून भारतामध्ये 17 सप्टेंबर 2022 रोजी आठ चित्ता प्राणी आणण्यात येणार आहेत.हे आठ चित्ते मध्य प्रदेश मधील नॅशनल पार्क मध्ये ठेवण्यात येणार असून चित्ता या प्राण्यावर पूर्णपणे वनविभाग लक्ष ठेवून राहणार आहे. केंद्र शासन व वन विभाग यांच्या प्रयत्नांमधून आठ चित्ते हे भारतात आणले जाणार आहेत. भारतामध्ये 1952 पासून चित्ता हा प्राणी नामशेष झाला आहे. भारतामध्ये चित्याची परत पुनरावृत्ती होण्याकरिता आठ चित्ता प्राणी भारतात आणले जाणार आहेत. चित्ता प्राण्याविषयी सखोल असे मार्गदर्शन दिले.
औंढा वनरक्षक सुधाकर चोपडे यांनी हि विद्यार्थी यांना चिता प्राण्यांविषयी माहीती दिली.
या कार्यक्रमास वनरक्षक सुधाकर चोपडे, शंकर गाजवे ,शरद सातपुते ,रावण पल्ले, वनराज राठोड ,सुदाम गायकवाड, पत्रकार,विलास काचगुंडे ,दत्ता शेगुकर ,पंजाब चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक दीपक राठोड प्रवेशक वीरचंद्र मलिंदे शिक्षक व आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते