बीड :- पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांना योग्य ते नमूद गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक स्थागुशा यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन करून सदर गुण्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना काल दिनांक 14 /9 /2022 खात्रीशीर माहिती मिळाली की इसम नामे दत्ता मुदळ रा. वडळी तालुका शिरूर का. जिल्हा बीड हा इसम चोरीची मोटर सायकल वापरत आहे. नामे इसम याला वडाळी येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली नमूद इसमास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मोटरसायकल चोरी करणारे इसम नामे सोनू घोलवड व दीपक बर्डे दोघे राहणार अंमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड यांचे कडून खरेदी केली असल्याचे माहिती दिली तरी चोरीची मोटार सायकल खरेदी करणारा व गावातील लोकांना चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यास मदत करणार इसम नमे दत्ता मुदळ याला ताब्यात घेण्यात आले. असून चोरी करणारे दोन्ही इसमाचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाणे शोध घेत असून आरोपीकडून आणखीन काही गुन्ह्याची माहिती मिळण्याची शक्यताआहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा. बीडचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांनी केली आहे.