आष्टी (प्रतिनिधी) सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले.आष्टी तालुक्यातील मनसेच्या वतीने बुधवार दि १४ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणेच्या आतीष बाजीने निदर्शने केले.यावेळी नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांना निवेदन देण्यात आले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर यांनी निवेदनात असे नमूद केले की,बीड जिल्ह्यातील सोयाबीन पिकासह विमा लागू असलेल्या विविध पिकांचे रॅन्डम पद्धतीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील ६३ पैकी १६ महसुली मंडळांमधील सोयाबीन पिकासह विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला असून सोयाबीनसह मागील तीन महिन्यात कमी अधिक पावसाने व किडींच्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या व पिकविमा लागू असलेल्या कापूस, तूर, मुग, उडीद आदी सर्वच पिकांना सर्व महसूल मंडळांमध्ये पीकविमा मंजूर करण्यात यावा.तसेच जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत बीड जिल्ह्यात सर्वदूर काही निवडक गावे वगळता पावसाने महिनाभर उघड दिली होती. या काळात ऐन जोमात आलेली पिके करपून गेली आहेत. बहुतांश भागांत अजूनही पाऊस नाही. जिल्ह्यातील ६३ महसुली मंडळांमध्ये मागील तीन महिन्यांत वेगवेगळ्या स्वरुपात नुकसानझाले आहे.

जिल्ह्यात त्यांतल्या काही आष्टी तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार आहे.मात्र, जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीने सर्वेक्षणाच्या नावावर घातलेला घोळ अक्षम्य असून शेतकन्यांमध्ये प्रचंय असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीला आवश्यकता असल्यास तातडीने पुन्हा फेर सर्वेक्षण करावे व सर्व ६३ महसुली मंडळांमधील सोयाबीनसह कापूस, तूर, मुग व उडीद या सर्व पिकांना तातडीने विमा वितरीत करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, विम्यासह शेतकऱ्यांना विशेष मदतीच्या प्रश्नाचे तत्काळ समाधान सरकारने केले नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल आणि शेतकरी बांधवांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यांच्या मदतीसाठी आणखी तीव्र आंदोलन करेल.असेही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक उंबरकर यांनी सांगितले.

यावेळी मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, मनसे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे, सचिन वाघूले, जयदीप मिसाळ, महेश मुरकुटे, सुनिल पाचपूते, ज्ञानेश्वर भालेकर, रोहित गावडे, बाबासाहेब झांबरे, युवराज खिळे, अरुण गावडे, अशोक जगताप आदी सर्व मनसेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.