अक्कलकोट तालुक्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
शेतीच्या सातबारावर एकाचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव लावण्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यामुळे अक्कलकोट तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश हणमंत कदम (वय - ४८) पद तलाठी, मुळ नेमणुक सज्जा गळोरगी, अति, कार्यभार सज्जा- मिरजगी तहसिल कार्यालय, अक्कलकोट ता. अक्कलकोट जि.सोलापूर असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी त्याच्या आईच्या नावे असलेली शेत जमीन विक्री केली असुन सदर शेतीच्या सातबारा उता-यावरुन तक्रारदार यांच्या आईचे नांव कमी करुन खरेदीदार यांचे नांव लावून ७/१२ उतारा देण्याकरीता यातील आलोसे गणेश हनुमंत कदम यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम ही तलाठी कार्यालय मिरजगी येथे स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस , निरीक्षक, लाप्रवि, सोलापुर, पोलीस अंमलदार पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना घाडगे, पोशि सन्नके, चापोना उडानशिव यांनी पार पाडली.