परभणी(प्रतिनिधी)मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त अक्षर आनंद जिल्हास्तरीय पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक विनोद शेंडगे यांनी दिली आहे. या स्पर्धेचा कालावधी दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 3 जानेवारी 2023 असा आहे. यासाठी प्राथमिक गट (वर्ग 3 ते 5 ) आणि उच्च प्राथमिक गट (वर्ग 6 ते 8 ) असे स्वतंत्र गट तयार करुन बालकांवर वाचन संस्कार घडविण्यासाठीचा कृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठीचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पुस्तक वाचून पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, पृष्ठ संख्या व किंमत या मुद्यांत वही अथवा रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ (दोन ओळी ) व मलपृष्ठ (दोन ओळी ), पुस्तकात काय आवडले. (सारांश -दहा ओळीर्)ें पुस्तकातून काय शिकलात ( बोध -पाच ओळी), पुस्तक वाचून मित्रांना काय संदेश देणार (दोन ओळी) हे लिहायचे आहे. सांगितलेल्या ओळीत माहिती लिहिणे बंधनकारक राहील.

ॅएक पुस्तक वाचून दिलेल्या वरील मुद्द्यानुसार व ओळीनुसार नोंदी लिहिल्या असतील तर त्या पुस्तकासाठी दोन गुण अन्यथा एक गुण दिला जाईल. हस्ताक्षरास पाच गुण, ॅवही सजावट बाहेरील बाजूने : दोन गुण, अंतरंग :नक्षीकाम, रेखाचित्रे, चित्रकाम यासाठी तीन गुण मिळतील.

निवड करण्याची पध्दत ठरवण्यात आलेली आहे. यात दिलेल्या मुद्द्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके वाचून रजिस्टर किंवा वहीमध्ये नोंदी लिहिणार्‍या बालकांचा अक्षर आनंद उत्कृष्ट बालवाचक म्हणून सन्मानित केले जाईल. प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडले जातील.

 तालुकास्तरावर प्रथम येणार्‍यास सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, 500 रूपयाची ग्रंथ भेट मिळणार आहे. द्वितीय : सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, 300 रुपयांची ग्रंथ भेट, तृतीय : सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, 200 रुपयांची ग्रंथ भेट असे या सन्मानाचे स्वरूप राहणार आहे.

निवडलेल्या उत्कृष्ट बालवाचकांतून दुसर्‍या फेरीत जिल्हास्तरावर निवड केली जाईल. त्यासाठी त्यांंना पुन्हा दोन महिन्याचा कालावधी देऊन पुस्तक वाचनाचे आव्हान दिले जाईल. ते आव्हान उत्कृष्टपणे पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांचा अक्षर आनंद उत्कृष्ट बालवाचक म्हणून जिल्हास्तरावर गौरव करण्यात येईल. 

अधिक माहितीसाठी विनोद शेंडगे (भ्रमणध्वनी -9923453123), अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र, परभणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.