केज (प्रतिनिधी) केज शहरातुन जुना युसुफवडगाव रस्ता जो की इंगळे वस्तीवरून जातो या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला पूर येऊन पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.पुलाचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे तेथे मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे पूलाच्या पुढे रहात असलेले लोंढे,इंगळे,ढगे,व इतर अनेक शेतकरी याना अडचण निर्माण झाली असून शेताकडे व घराकडे जाणा-या रस्त्याचा संपर्क तुटल्याने येणे जाणे बंद झाली आहे. हा कच्चा पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सुनील लोंढे,भारत लोंढे,भारत जाधव,दत्ता लोंडे, कन्नडकर, अंटू देव,अशोक कदम,विजय ढगे,मंधार देशपांडे,भीमराव पवार,बप्पा इंगळे व ग्रामस्थांनी केली आहे.