बीड - स्व बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना मजबूत केली आहे. आज ती खिळखीली करण्याचा विरोधकांचा डाव हेच शिवसैनिक उधळून लावणार आहेत. शिवसेना उध्वस्तीचा डाव आखणाऱ्या गद्दारांना निष्ठावंत शिवसैनिक पुरून उरतील, यासाठीच बीड मधून बीड ते मुंबई निष्ठा पदयात्रा निघत असल्याचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक प्रदीप कोटूळे यांनी सांगितले आहे.
शिवसैनिक तथा माजी शहर व तालूका प्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वा खाली ही निष्ठा यात्रा गुरुवारी निघत आहे. उल्हास गिराम यांच्या चोख नियोजनाने सहभागी होणाऱ्या शिवसैनिकांची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. बीड ते मुंबई शिवतीर्थ ही यात्रा संपूर्ण 21 दिवसाची असेल. या 21 दिवसात सकाळचा चहा नाष्टा, दोनवेळाचे जेवण, मुक्कामाची सोय, अंथरून पांघरून, रेनकोट, तज्ञ् डाक्टर ऍम्ब्युलन्स, व प्रत्येक सहभागी शिवसैनिकांचा अपघाती विम्या उतरवण्यात आला असल्याचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक प्रदीप कोटूळे यांनी कळवले आहे.